महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक -महाराष्ट्रात १९५१ साली सुमारे ३०००० कि मी लांबीचे रस्ते होते. २०११ नुसार रस्त्याची लांबी २,४१,७१२ कि मी आहे.

राष्ट्रीय महामार्ग - (क्रमांक व राज्यातील लांबी)राज्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी ४,३६७ कि मी आहे. महाराष्ट्रात पुढील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहेत.

* मुंबई- नाशिक- आग्रा महामार्ग क्रमांक ३ याची लांबी ३९३ कि मी आहे.

* मुबई - पुणे - बंगळूरू - चेन्नई महामार्ग क्रमांक ४ लांबी ३७१ कि मी आहे.

* न्हावाशेवा - कळ्म्बोरी - पळस्पे महामार्ग क्रमांक ४ ब लांबी २७ कि मी आहे.

* हाजिरा - सुरत - नागपूर - कोलकाता महामार्ग क्रमांक ६ लांबी ८१३ कि मी आहे.

* वाराणसी - नागपूर - हैदराबाद - बंगळूरू महामार्ग क्रमांक ७ लांबी ३३६ कि मी आहे.

* मुंबई - अहमदाबाद - जयपूर - दिल्ली महामार्ग क्रमांक ८ लांबी १२८ कि मी आहे.

* पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा महामार्ग क्रमांक ९ लांबी ३३६ कि मी आहे.

* सोलापूर - वीजापुर - चित्रदुर्ग महामार्ग क्रमांक १३ लांबी ४३ कि मी आहे.

* निजामाबाद - जगदलपुर - महामार्ग क्रमांक १६ लांबी ३० कि मी आहे.

* पनवेल - गोवा - मंगलोर - एडापल्ली  महामार्ग क्रमांक १७ ४८२ कि मी आहे.

* पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० लांबी १९२ कि मी आहे.

* नागपूर - अब्दुलागंज महामार्ग क्रमांक ६९ लांबी ५५ कि मी आहे.

* रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग क्रमांक २०४ लांबी १२६ कि मी आहे.

* सोलापूर - औरंगाबाद - धुळे महामार्ग क्रमांक २११ कि मी लांबी आहे.

* कल्याण - अहमदनगर - नांदेड - निर्मल -महामार्ग क्र २२२

* महाराष्ट्रातील मुंबई पुणे हा सहा पदरी महामार्ग असून तो महाराष्ट्रातील पहिला व देशातील पहिला सहापदरी रस्ता होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.