गोपाळ गणेश आगरकर


जीवन परिचय
आगरकरांचा जन्म १४ जुले १८५६ रोजी सातारा जिल्ह्यात कऱ्हाडजवळ असलेल्या टेंबू या गावी झाला. ब्राम्हणकुटुंबात जन्म झालेल्या आगरकरांच्या आईचे नाव हे सरस्वती होते, तर वडिलांचे नाव गणेश होते.

अकोला येथे जाऊन दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे पुणे येथे आल्यावर डेक्कन कॉलेजात प्रवेश घेऊन १८७८ मध्ये बि ए ची पदवी संपादन केली.
इतिहासात व तत्वध्यान हे विषय घेऊन एम ए  ची पदवी संपादन केली. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली.पुणे येथे फर्गुसन कॉलेजात प्राध्यापक झाले.


समाजसुधारणा
१८८१ मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरु केली. १८८१ पर्यंत त्यांनी केसरीचे संपादन सुद्धा केले.

कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात आगरकर व लोकमान्य टिळकांनी १०१ दिवसांची कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगात असताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस  हे पुस्तक लिहिले.

१८८८मध्ये त्यांनी सुधारक हे पुस्तक लिहिले.

१८८० मध्ये मुंबई येथे विष्णुशात्री चिपळूणकर लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने न्यू  इंग्लिश स्कूलची स्थापना केली.आपल्या जीवनाचे देखील इष्ट असे बोलावे, .सांगावे व करावे या वृत्तीचा स्वीकार केला.

आगरकरांनी १८९३ च्या सुधारक अंकात आगरकरांनी म्युन्सिपल हौद व गदा हा लेख लिहून अस्पृश्यता यावर टीका केली.

महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी ही संस्था उभारली.

आगरकरांच्या बाबतीत वि स खांडेकर असे म्हणतात  की आगरकर म्हणजे देव न मानणारा देवमाणूस होय.

समाजातील वेगुण्यावर प्रकाश टाकून आपले जीवन जगत १७ जुन १८९५ रोजी झाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.