अणुशक्ती संशोधन संस्था

अणुशक्ती संशोधन संस्था

* भारतामध्ये विविध अणुसंशोधन संस्था केंद्राची स्थापना झाली आहे. त्यापैकी खालीलपैकी काही आहेत.

* भाभा अणुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे - मुंबई [ महाराष्ट्र ], टाटा इन्स्टीटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुंबई, हाय अल्टीटयुट रिसर्च लेबोरटरी गुलमर्ग - जम्मू काश्मीर, इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर मुंबई - महाराष्ट्र, शाहू इन्स्टीट्युट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स - कोलकाता इत्यादी अनुसंशोधन संस्था आहेत.


भाभा अणुसंशोधन केंद्र - तुर्भे [ Bhabha Atomic Resarch Centre - Trombe ]
* भारतात अग्रेसर आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त झालेल्या या अनुकेंद्राचे नामकरण डॉ होमी भाभा जहागीर यांच्या नावाने झालेले आहे.

* भारताच्या दीर्घ मुदतीच्या विद्युत उर्जेची गरज भागविण्यासाठी इ. स. १९४८ मध्ये भारतीय अणुउर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.

* भारत सरकारने १९५४ मध्ये स्वतंत्र अणुउर्जा खात्याची स्थापना केली त्यानंतर २० जानेवारी १९५७ रोजी या केंद्राचे उदघाटन त्या वेळचे पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

* अणुउर्जेचा विकास करणे व त्या उर्जेचा दैनदिन जीवनात कसा उपयोग करता येईल, याविषयीचे संशोधन करणे, वैद्यकीय व्यवसाय जैविक शास्त्रे इत्यादी क्षेत्रांचा विकास करणे.


केंद्राची कार्ये
* किर्नोस्तारी संस्थानिकांची निर्मिती व त्यांचे परीक्षण करणे, अणुभट्टीमध्ये वापरण्यास योग्य शुद्ध युरेनियम धातू व त्याच्यापासून इंधन घटक बनविण्याचे संशोधन या केंद्रात केले जातात.

* १९५९ मध्ये प्रथमता याप्रकारचे शुद्ध युरेनियम बनविण्यात आले, सायरस या अणुभट्टीत लागणारे अल्युमिनिअम अमवेष्टित वापरण्यास योग्य इंधन याच ठिकाणी तयार केले आहे.

* युरेनियम ऑकसाईड गुलिका झिकार्णोनियमच्या मिश्रधातू अवेष्टीत केल्या जातात. तसेच कच्च्या झीकार्णोनियम निष्कर्षण व शुद्धीकरण करण्याचे तंत्रज्ञान येथे विकसित करणात येते.


भारतातील अणुउर्जा प्रकल्प
* तुतीकोरीन प्रकल्प - १९४८ साली सुरवात, जर्मन कंपनीच्या तांत्रिक आधारे, सदर्न पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीज खत कारखान्याशी संलग्न, वार्षिक ७१.३ टन अवजड पाण्याचे उत्पादन.

* तालचर प्रकल्प - १९७९ साली प्रकल्पाची सुरवात, जर्मन कंपनीचे तांत्रिक सहाय्य, तालचर फर्टीलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कारखान्याशी संलग्न आहे. वार्षिक ६२.७ टन अवजड पाण्याचे उत्पादन. हैद्राबादच्या आण्विक इंधन संकुलाचे सहाय्य.

* तारापूर अणुशक्ती केंद्र - भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र, अमेरिकन जनरल इलेक्ट्रिकल्स यांचे तांत्रिक सहाय्य, दोन उकळत्या पाण्याचे संच, समृद्ध युरेनियम इंधनाचा उपयोग, ४२० मेगावट विजनिर्मिती, महाराष्ट्र व गुजरातला वीजपुरवठा.

* राजस्थान अणुशक्ती केंद्र - १९९१ साली पूर्णत्वास आलेले, सुरवातीस कॅनडा कंपनीचे सहाय्य पण नंतर भारतीय तंत्राने पुर्णता, युरेनियम इंधनाचे केंद्र, अवजड पाण्याचे कंडू प्रकारचे दोन प्रकल्प, क्षमता २२० कि vat.

* मद्रास अणुशक्ती केंद्र - प्रथम भाग १९८० व द्वितीय १९८९ साली पूर्णत्वास, राजस्थानप्रमाणे दोन कंडू प्रकारचे संच, विदेशी सहकार्य नसून ८०% भाग देशी.


अणुउर्जा मंडळे
* अमेरिकेत सन १९४६ पूर्वी अणुउर्जाविषयक धोरण युद्धखात्याच्या एका विभागामार्फत ठरविले जात असे, इ स १९४६ मध्ये काँग्रेसने कायदा करून अणुउर्जा आयोगाची आटोमिक एनर्जी कमिशन याची स्थापना केली.

* अणुउर्जाविषयक सन १९५४ च्या कायद्यानुसार ब्रिटनमध्ये आटोमिक एनर्जी ऑथोरिटी या मंडळाची स्थापना केली गेली.

* शांततामय कार्यासाठी अणुउर्जेचा विनियोग करावा, हे उदिष्ट सर्व राष्ट्रांचे आहे. परंतु सर्वच राष्ट्राजवळ त्यासाठी आवश्यक असे तांत्रिक ज्ञान व साधनसामुग्री असणे शक्य नाही.

* त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यावरच अशा राष्ट्रांना अवलंबून राहावे लागते. या दृष्टीने इ स १९५७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा मंडळ स्थापन केले आहे.


भाभा अनुसंधान केंद्र
* या अणुशक्ती संशोधन केंद्राची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. त्याला अणुशक्ती केंद्र, तुर्भे असे म्हटले जाते.

* हे सर्वात मोठे अणुकेंद्र आहे, त्यानंतर इ. स. १९६७ मध्ये याचे नाव बदलण्यात आले. व त्याला भाभा अणुशक्ती केंद्र हे नाव देण्यात आले.

* अणुतंत्रज्ञान विकसित करण्यात भाभा केंद्राने फार महत्वाची कामगिरी बजावली आहे. अणुवीज केंद्राची उभारणी, अनुसंधान प्रक्रिया, लेसर, शेती अशा अनेक क्षेत्रात येथे मुलभूत संशोधन कार्य चालते.


उन्नत औद्योगिक केंद्र
इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्र - १९७१ साली इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्राची स्थापना कल्पकम येथे करण्यात आली. या केंद्रामार्फत फास्ट रियक्टार औद्योगिक या कारणासाठी उपयोग करण्यात आली.

* हे अणुशक्ती केंद्र मध्यप्रदेशामध्ये इंदूर येथे स्थापन केले गेले. यामार्फत फ्युजन, लेसर, इत्यादी उच्च औद्योगिक क्षेत्रामध्ये संशोधन  विकास कार्य करण्यात येते. या केंद्राची स्थापना १९४८ साली करण्यात आली.

* १९८७ मध्ये एकूण ७ अणूवीज केंद्राचे नियमन, चलन उभारणी सर्व कामासाठी न्युक्लिअर पॉवर स्टेशन ऑफ इंडिया ची निर्मिती करण्यात आली आहे.

* यात तेथील २ युनिट्स रावतीटा येथील दोन युनिट्स कल्पकम येथील नरोरा येथील एका युनिटचा समावेश आहे.

* संशोधन केंद्र -  भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई, टाटा मौलिक संशोधन संस्था, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, कर्करोग संशोधन केंद्र - कोलकाता, सहा अणुगर्भ भौतिक संस्था - अहमदाबाद, भौतिक अन्वेषण संस्था.

* अणुभट्ट्या - अप्सरा - मुंबई, सिरस व झर्लीना, तारापूर - अणुशक्ती प्रकल्प, राणा प्रतापसागर अणुशक्ती प्रकल्प - कल्पकम,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.