डॉ पंजाबराव देशमुख


जीवन परिचय
डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ  या गावी एका मराठा शेतकरी कुटुंबात झाला.वडिलांचे श्यामराव व आईचे नाव राधाबाई होते.त्यांचे आडनाव कदम  असे होते. वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे नाव पडले.

पंजाब्रावाचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले.अमरावतीच्या हायस्कूलमधून १९१८ साली म्याट्रिकची परीक्षा पास झाले.पंजाबराव उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले.तेथे त्यांनी फर्गुसन कॉलेजात प्रवेश घेतला.नंतर ते इग्लंडला गेले.तेथे त्यांनी एडिनबरो विद्यापीठाची एम ए व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी लिट या पदव्या मिळवल्या.इग्लंडला असताना त्यांनी वकिलीची पदवी मिळाली. पुरोगामी विचाराचे देशमुख यांनी मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई नावाच्या मुलीशी विवाह केला.

सामाजिक कार्य
१३ व १४ नोवेंबर १९२७ मध्य  त्यांच्याच प्रयत्नातून अमरावतीतील इंद्रभुवन थिएटर मध्ये वर्हाड अस्पृश्य परिषद भरविण्यात आली. त्या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब होते.
१९२८ मध्ये अमरावती जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष झाल्यावर त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यासाठी खुल्या केल्या. अमरावतीचे अम्बामंदीर दलितांचासाठी  केले. अखिल भारतीय मागास जातीसंघशी स्थापना त्यांनी केली.

शिक्षणासाठी कार्य
सन १९२६ मध्ये त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय  सुरु केले.

पंजाबरावनी १९३० साली शिवाजी शिक्षण संस्थेची  केली. भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली.
१९२७ मध्ये त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली.

त्यांनी महाराष्ट्र केसरी  हे वृत्तपत्र चालविले. पंजाबराव देशमुख यांना १९५२ मध्ये केद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला.

पंजाबराव देशमुखांनी १९५५ साली 'भारत कृषक समाजाची' स्थापना केली.  त्यांचे विद्यामध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी- विक्री संघाची स्थापना झाली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.