कार्य आणि उर्जा, नैसर्गिक साधनस्त्रोत


कार्य आणि उर्जा  - कार्य करणाऱ्या क्षमतेला उर्जा असे म्हणतात.

कार्याचे मापन
एखाद्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात.

कार्याचे मापन - पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाचे कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने आक्रमिलेले अंतर यांच्या गुनाकाराइतके असते.

केलेले कार्य = बल * बलाच्या दिशेने  झालेले  विस्थापन होय.

* बल व विस्थापन एकाच दिशेने प्रयुक्त होतात.

* बल हे ऊर्ध्वगामी दिशेने व विस्थापन हे क्षितीज समांतर असल्यास कार्य होत नाही.

* बल व विस्थापन हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असतील तर कार्याचे मुल्य ऋण असते.

उर्जाएखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची उर्जा होय. उर्जा ही आदिश राशी होय.
गतिज उर्जा - पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज उर्जा असे म्हणतात. सुटलेली गाळी. सूत्र W=१२mv२
स्थितीज उर्जा -पदार्थाला विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी उर्जा सामावलेली असते. तिला स्थितीज उर्जा असे म्हणतात.डोंगरावरील दगड किंवा धरणात साठवलेली पाणी होय. सूत्र - W=mgh


उर्जा अक्षय्यतेचा नियम

उर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतर करता येते. तथापि विश्वासातील एकूण उर्जा एकूण अक्षय राहते.आईनस्टाइन च्या मते E =mc२  C = प्रकाशाचा वेग
* स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज उर्जा वाढते.
* MKS पद्धतीत कार्याचे एकक ज्युल आहे.  


उर्जे चे प्रकार

* स्थितीज उर्जा - पदार्थाच्या ताणामुळे म्हणजेच स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज उर्जा म्हणतात. स्थितीज    म्हणजे स्थितीमुळे प्राप्त झालेली उर्जा होय. उदा ताणलेला बाण.

* गतिज उर्जा - प्रत्येक गतिमान वास्तूमध्ये उर्जा असते. गतीमुळे प्राप्त झालेल्या उर्जेला गतिज उर्जा असे म्हणतात. उदा - धरणाचे सोडलेले पाणी.

* चुंबकीय उर्जा हे उर्जेचे रूप आहे.

नैसर्गिक साधनस्त्रोत * नवीकरणीय - जे पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण करता येतात. त्या स्त्रोताना नवीकरणीय साधने म्हणतात.

* अनविकरनीय - जे स्त्रोत कोणत्याही पद्धतीने निर्माण करता येत नाही त्यांना अनविकरनीय असे म्हणतात.

 * बायोडीजेल - जट्रोपा या वनस्पती पासून तयार केले जाते.

* मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला निक्षेपण म्हणतात.

* काही स्थायुना उष्णता दिली तर कि त्याचे रुपांतर द्रवात न होता एकदम वायूमध्ये होते याला संप्लवन असे म्हणतात.उदा. आयोडीन, नवसागर, कापूर, डांबराच्या गोळ्या हे संप्लवन पदार्थ आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.