महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था


* महानगरपालिका - २६,
* नगरपालिका - २२१,

नगरपालिकेचे वर्गीकरण -

१) ज्या नगरपालिका शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे त्या नगरपालिकेला 'अ' वर्ग नगरपालिका असे म्हणतात. महाराष्ट्रात अ वर्ग नगरपालिका १८ आहेत.

२) ज्या नगरपालिका शहराची लोकसंख्या चाळीस ते एक लाख च्या दरम्यान आहे त्या नगरपालिकेला 'ब' वर्ग नगरपालिका असे म्हणतात. महाराष्ट्रात ब वर्ग नगरपालिका ६२ आहेत.

३) ज्या नगरपालिका शहराची लोकसंख्या चाळीस हजार पेक्षा कमी आहे त्या नगरपालिकेला 'क' वर्ग नगरपालिका असे म्हणतात. महाराष्ट्रात क वर्ग नगरपालिका १४१ आहेत.


महानगर पालिकेचे वर्गीकरण
१) ज्या महानगर शहराची लोकसंख्या ५० लाखापेक्षा जास्त आहे त्या महानगरपालिकेला 'अ+' वर्ग महानगरपालिका असे म्हणतात. उदा- मुंबई महानगरपालिका

२) ज्या महानगर पालिका शहराची लोकसंख्या २० लाखापेक्षा जास्त आहे त्या महानगरपालिकेला 'अ' वर्ग
महानगरपालिका असे म्हणतात. उदा पुणे, नागपूर,

३) ज्या महानगर शहराची लोकसंख्या १० लाखाच्या वर आहे त्या महानगरपालिकेला 'ब' वर्ग महानगरपालिका असे म्हणतात. उदा. नाशिक ठाणे

४) ज्या महानगर शहराची लोकसंख्या ५ लाखाच्या वर आहे त्या महानगरपालिकेला 'क' वर्ग महानगरपालिका असे म्हणतात. उदा. अमरावती सोलापूर

५) ज्या महानगर शहराची लोकसंख्या ३ लाखाच्या वर आहे त्या महानगरपालिकेला 'ड' वर्ग महानगरपालिका असे म्हणतात. उदा अकोला धुळे

* महाराष्ट्रात ज्या शहराची लोकसंख्या ३ लाखापेक्षा जास्त झाली त्या शहराला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात येतो.

*  महाराष्ट्रात कटक मंडळे ७ आहेत. महाराष्ट्रात नगरपंचायती ५ आहेत.

* जिल्हा परिषदा - ३३ मुंबई शहर व उपनगर सोडून

* महाराष्ट्रात एकूण महसुली खेडे ४३,६६३ आहेत.

* ग्रामपंचायती २७९०६ आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.