गती व गतीचे प्रकार


* स्थानातरीय गती - जर वस्तूची स्थानातरनीय गती एका सरळ रेषेत असेल तर त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. उदा - चालणारा माणूस.

* घ्रूणन गती - या गतीमध्ये वास्तुमधील वेगवेगळे कण एकाच आसाभोवती वर्तुळाकार मार्गाने असतात. फिरणारा पंखा,

* दोलन गती - दोलन गतीमध्ये पदार्थात एकाच प्रकारची हालचाल पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होते. उदा - शिवनयंत्राची सुई.

 * रेषीय गती - एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात.

* एकसमान गती - ठराविक अंतरावर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एकसमान गती असे म्हणतात.

* आंदोलीत गती - वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात.उदा. सतारीची तार.

* नियतकालिक गती - ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक एका विशिष्ट बिंदुतून जाते. त्या गतीला नियतकालीक गती  असे म्हणतात. उदा सेकंद व मिनिट काटा

* यादृच्छिक गती - ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. उदा फुलपाखराचे फिरणे.

* वर्तुळाकार गती - वर्तुळाकार गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदा पंखा

अंतर
जेव्हा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाते. तेव्हा त्या दोन ठिकाणा मधील लांबीला अंतर अस म्हणतात.

विस्थापन - तर त्या दोन ठिकाणामधील विशिष्ट दिशेने चाललेल्या एकरेषीय लांबीला विस्थापन असे म्हणतात.

* अंतर हि आदिश राशी आहे .

* विस्थापन हि सदिश राशी आहे.

* मुलभूत राशी - CGS पद्धती सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, MKS पध्दतीत मीटर, किलोग्रॅम, सेकंद.


चाल, वेग, त्वरण
चाल - एखाद्या वस्तूच्या एकक काळात कापलेल्या अंतरास  वस्तूची चाल 'चाल ' म्हणतात. सरासरी चाल =एकूण  कापलेले अंतर लागलेला एकूण वेळ 

वेग velocity - एखाद्या वस्तूने एकक काळात एखाद्या विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात. सरासरी वेग = दिशेने कापलेले अंतर लागलेला एकूण वेळ

त्वरण - Acceleration - जर वस्तूच्या वेगामध्ये वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन आणि जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण आहे  समजते. त्वरण = वेग बदल लागलेला वेळ

एकसमान गती - जर  एखादी वस्तू सारख्याच कालावधीत सारखेच अंतर आक्रमित असेल तर त्या गतीस एकसमान गती असे म्हणतात.

नैकसमान गती - जर एखादी वस्तू सारख्या कालावधीत एकसमान गती आक्रमत नसेल. असे दिसत नसेल तर ती नैकसमान गती असे म्हणतात.


आदिश राशी, सदिश राशी
आदिश राशी - जी भौतिक राशी केवळ परिणामाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते तिला आदेश राशी म्हणतात. उदा वस्तुमान, आकारमान, घनता, वेळ, चाल, कार्य हि आदिश राशीची उदाहरणे आहेत.

सदिश राशी - जी भौतिक राशी केवळ पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हीची गरज भासते.

विस्थापन, वेग, त्वरण, बल ह्या सर्व सदिश राशी आहेत.

* त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर होय.

* जर एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर त्या वस्तूची चाल व दिशा कायम राहते.

* सदिश राशीचे वर्णन परिणाम व दिशा आवश्यक असतात.


जडत्व, बल, त्वरण
* एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजेच बल होय. बल दर्शवण्यासाठी आपल्याला त्याचे परिणाम व दिशा दोन्हीचे परिणाम करावे लागते. म्हणून हि सदिश राशी आहे.

* जडत्व - प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलला म्हणजे त्वारणाला विरोध करते विरोध करण्याच्या या वृत्तीला जडत्व असे म्हणते.

* वस्तूचे जडत्व तिच्या वस्तुमानावर अवलंबून असते. बह्यबल कार्यरत नसेल तर विराम अवस्थेतील बदलला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करण्याच्या या वृत्तीला जडत्व असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.