वनस्पतीचे वर्गीकरण - १


वनस्पती दोन उपसृष्टीत विभागता येतात.

अबीजी - निम्नकुलिन, बीजविरहीत, किंवा अपुष्प वनस्पती असतात. या समूहात असंवहनी व संवहनी वनस्पतीचा समावेश होतो.

असंवहनी - या वनस्पतीमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असतो. म्हणून ह्यात संवहनी संस्था नसते. उदा. थालोफायटा, प्रकायोदिप्ती, यात मूळ, खोड, पाने नसतात. संवहनी नसते.

शैवाल - यात साध्या वनस्पतीचा समावेश असून त्या पोषणासाठी प्रकाश स्वयंपोशी पद्धतीचा अवलंब करतात. उदा. शैवाल, स्पायरोगायारा, कारा,

कवक - हि परपोशी वनस्पती आहे. यापैकी इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर जगतात. तर काही मृतोपजीवी म्हणजे मृत पदार्थावरील कार्बनीय द्रव्यावर जगतात. पेनिसिलीया, म्युकर, अग्यारीकस, साक्रोमायसीस, एकपेशीय कवकांना, किण्व असे म्हणतात.

शैवाल कवके - ज्या संरचनेत निलरहित जीवाणू आणि शैवाल यापैकी एक सजीव कवकाबाहेर असते. त्याला शैवाल कवके असे म्हणतात. आपण त्यांना दगडफूल म्हणून संबोधतो.

जीवाणू - जीवाणू हे एकपेशीय सजीव आहे. केंद्रक व अंगके नसतात. उदा. द्विभागी विखंडन, दंडगोलीय बासिलस, गोलीय कोकाय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.