न्युटनचे गतिविषयक नियम


न्युटनचा गतिविषयक पहिला नियम
जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर त्या वस्तूची विराम अवस्था किंवा एका सरळरेषेतील एकविध गतिमान अवस्था तशीच राहते. तिच्यात काहीही बदल होत नाही. न्यूटनचा पहिला नियम जडत्वशी संबधित आहे.

न्युटनचा गतिविषयक दुसरा नियम
संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्युटनचा दुसरा नियम संवेगावर आधारित आहे. वस्तुमान आणि तिचा वेग ह्या दोन्ही राशी एकत्रित पने तिच्यामुळे होणारा आघात ठरवितात. जर वस्तूवर बल स्थिर बल कार्यरत असेल तर वस्तूचे त्वरनही स्थिर असते.

* एखाद्या वस्तूवर कार्यरत बल दुप्पट केले तर त्वरण अर्धे होते.

न्युटनचा गतिविषयक तिसरा नियम
जलतरण पटू आपल्या हाताने व पायाने पाण्याने मागे सारतात. तेव्हा त्याची प्रतिक्रिया म्हणून पाणी पोहणाऱ्याला पुढे ढकलते. यापैकी कोणत्याही एका बलाला क्रिया व क्रीयाबल आणि दुसऱ्याला प्रतिक्रिया बल असे म्हणतात." प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. व त्यांच्या  परस्पर विरुद्ध दिसते. याचे उदहरण म्हणजे रॉकेट किंवा अग्निबाण होय.

संवेग अक्षय्यतेचा नियम
वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्याच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग कायम राहतो. तो बदलत नाही यालाच अक्षय्य्त्तेचा नियम म्हणतात.

* बलाचे mks मधील एकक न्यूटन आहे.

* कोणत्याही वस्तूची विराम अवस्था किंवा एकविध गतीने जाण्याची अवस्था बदलण्यासाठी बाह्य साधण्य्याची आवश्यकता असते.

* वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण दुप्पट होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.