महात्मा गांधी व त्यांचे सत्याग्रह


दक्षिण आफ्रीकेसारखी दयनीय अवस्था भारताची होती. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी गांधीनी भारत भ्रमण केले. तेव्हा त्यांचे असे मत होते कि स्वतंत्र हे आपणास स्वतःहून प्राप्त होणार नाही. ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला ब्रिटीश शासनाविरोधात सत्याग्रहाचे [१९१६] मध्ये शस्त्र हाती घेतले.

फिजी बेटावरील सत्याग्रह
* हिंदुस्तानातील श्रमिकांना इंग्रज अधिकारी मुदतबंदीचे करार करून फिजी बेटावर त्यांच्या शेतात काम करण्यासाठी
घेवून जात होते.
* इंग्रजांच्या शेतात काम करणाऱ्या त्या मजुरांना अतिशय गुलामासारखी वागणूक देत.
* कोणत्याही गुलामगिरीची पद्धत हि कायद्यान्वये नष्ट केली जाईल असा विश्वास सरकारने दिल्यानंतर त्याकडे सरकार हेतुपरस्पर दुर्लक्ष करीत होते.
* म गांधीनी फिजी बेटावरील पिळवणूक थांबवण्यासाठी ३१ मे १९१७ पासून सत्याग्रहाची चळवळ सुरु झाली.

चंपारण्य सत्याग्रह [१९१७]
* बिहार राज्यामध्ये चंपारण्यात इंग्रजांचे निळीचे मळे होते. या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजूर वर्गावर मोठ्या प्रमाणावार अन्याय होत होता. व त्याच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतले जात होते.
* गांधीनी चंपारण्यात पोलिसांना प्रवेश करण्यास ब्रिटीश पोलिसांना मनाई करण्यात आली.

अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा संप [१९१८]
* अहमदाबाद येथील गिरणीत काम करणाऱ्या मजुरावर गिरणीमालक अन्याय. अत्याचार करून त्यांची पिळवणूक करीत होते.
* गिरणी मालकांच्या शोषानाविरुध आवाज उठवण्याची व वेतनवाढीसाठी गांधीजीनी कापड गिरणी कामगारांना संघटीत केले. व १९१८ साली संप पुकारला.

खेडा सत्याग्रह [१९१८], रौलट सत्याग्रह
* गुजरात मधील खेडा या गावीही शेतकऱ्यांच्या प्रेरणेने सन १९१८ मध्ये सत्याग्रह झाला.
* रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह [१९१९]
* रौलट कायदा पास करूनही इंग्रजांनी दडपशाहिचे धोरण पुढे सातत्याने चालूच ठेवले होते.
* त्यामुळे या कायद्याविरोधात म गांधीनी ६ एप्रिल १९१९ रोजी संपूर्ण देशात हरताळ पाळण्याचे आवाहन केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.