निरीक्षन उपग्रह

Landsat Satellite
* हि मानवारहित उपग्रह प्रणाली असून त्यातील पहिला उपग्रह असून अमेरिकेने १९७२ मध्ये अंतराळात पाठविला.

* या उपग्रहात विशिष्टविषयक मानचीत्रक संवेदक उपयोगात आणले गेले आहे. त्यातील पहिल्या संवेद्काची क्षमता ८० किमी तर दुसऱ्या संवेदकाची क्षमता ३० किमी एवढी आहे.

* उंचीवरून एक फेरी ९९ मिनिटात पूर्ण करून चित्रण करतात.


ओशन Sat
* भारतीय दूरसंवेदन उपग्रह मालिकेतील IRM एक महत्वाचा उपग्रह ओशन Sat चे प्रक्षेपण २६ मे १९९९ रोजी करण्यात आले.

* देशाची प्रचंड लांब समुद्रकिनारपट्टी लक्षात घेवूनच या उपग्रहाची रचना करण्यात आली.

* हवामानाच्या माहितीसाठी समुद्रीप्रदेश व मोसमी वारे यांच्या क्रिया प्रतिक्रिया जाणणे आवश्यक आहेत. किनारी प्रदेशांचा बारकाईने अचूक अभ्यास तसेच त्यांचे नियोजन कार्य या उपग्रहामुळे सहज शक्य झालेले आहे.

* ओशन Sat या उपग्रहाचे वैज्ञानिक नाव IRSP - ४ असून तो २६ मे १९९९ रोजी अंतराळामध्ये झेपावला.


आयकोनॉस
* २४ सप्टेंबर १९९९ रोजी अमेरिकेच्या स्पेस इमेजिंग कंपनीचे आयकोनॉस उपग्रह सोडून एक मीटर वियोजन असलेल्या प्रतिमा उपलब्द करून दिल्या आहेत.

* आयकोनॉस १ मीटर वियोजन असलेल्या प्रतिमा व त्यातील उत्तमता, वास्तविकता वाखाण्यासारखी आहे.

* भारताच्या विविध स्तरावरील समस्यांच्या निराकरणासाठी आयकोनॉस हे उत्तम प्रभावशाली तंत्र उपलब्द झालेले आहे.


रिसोर्स Sat
* भारतीय अवकाश संशोधनातील आयआरएस प्रणालीतील दहावा अत्यंत महत्वाकांक्षी उपग्रह म्हणजे रिसोर्स sat होय.

* या उपग्रहामुळे उत्तम प्रकारचे चित्रे उपलब्द होत आहेत. भूप्रदेशासंबंधीची संपूर्ण सांखिकी अतिशय योग्य प्रमाणात उपलब्द होत नाही.

* या उपग्रहामुळे जमीन आणि पाणी यांचे इंटिग्रेटेड व्यवस्थापण पिकांची माहिती, वनसंपदा, पर्यावरण इत्यादी साठी सर्व प्रकारची माहिती उपलब्द झाली आहे.


Insat उपग्रह
* Insat उपग्रह प्रणालीमुळे दूरसंपर्क, हवामानविषयक माहिती संकलन, दूरदर्शन आणि आकाशवाणी कार्यक्रम प्रसारण उत्तमरीत्या उपयोग होत आहेत.

* या प्रणालीमध्ये INsat १ बी, २ए, २बी, २सी, भूस्थिर कक्षेत सहस्थित होते.

* भारतीय एनटीपीसी, गेल, एनपिसी, आयटीआय, ओएनजीसी, या सर्व संस्था या उपग्रहावर आधारित दूरसंचार जाळ्यांचा उत्तमरीत्या उपयोग करून घेत आहेत.


मेट SAT
* या उपग्रहामुळे हवामानविषयक विशिष्ट सेवेसाठी त्याचा उपयोग करण्यात आला. यामुळे सेवांमध्ये अखंडता टिकविणे, माहिती प्रसारणाचा दर्जा व क्षमता सुधारणे व आपत्ती व्यवस्थापनात अधिकाधिक सक्षमता आणणे.

* या उपग्रहामुळे उच्च क्षमतेच्या प्रारण मापकामुळे पृथ्वीवरील दृश्य तसेच औष्णिक, थर्मल, इन्फ्रारेड, आणि बाष्पाच्या प्रतिमा घेता येणे शक्य झालेले आहे.

* हा उपग्रह २९५ टन वजनाच्या पोलर लाँच व्हेइकल या प्रक्षेपणाच्या मदतीने सोडण्यात आलेला आहे. या उपग्रहामुळे ध्रुवीय आणि भूस्थिर अशा दोन्ही भ्रमनकक्षामध्ये उपग्रह पाठविण्याची क्षमता स्पष्ट झाली आहे

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.