वनस्पती वर्गीकरण भाग - ३


सबीजी वनस्पती -  यांना उच्चकालीन वनस्पती असे म्हणतात. यात बीजे असतात. या संवहनी वनस्पती होत.

* वनस्पतीची योग्य वाढ, मूळ - स्तंभ - पर्ण असे विभेदन झालेले असते.

* जलवाहिन्या आणि रसवाहिन्या उती असतात. जलवाहिन्या खनिजांचे तर रसवाहिन्या कार्बनीय अन्नद्रव्याचे वहन करते.

प्रकार -
१) अनावृत्तबीजी वनस्पती - यांच्या बिजावर आवरण नसते. संरक्षक आवरण नसते, परागबीजे ज्यावर असतात त्यांना लघुबीजपात्र म्हणतात. उदा. सायकस, सुचीपर्णी, पायनस, देवदार, प्रकारात मोडतात.

२) आवृत्तबीजी वनस्पती - यांच्या बिजावर आवरण असते. लहान फळे, बीजांडाचे रुपांतर बीजामध्ये व अंडाशायामध्ये फळात होते. या वनस्पतीत प्रजनांग असते. अतिसूक्ष्म अशा जलीय वनस्पती, वूल्फिया ते प्रचंड आकाराच्या अस्त्रेलिअन अक्याशिया किंवा युक्यालीप्तम्स यांचा समावेश होतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.