माहिती तंत्रज्ञानाचे उपयोग

माहिती तंत्रज्ञानाचे उपयोग
* १५ जून २००५ रोजी माहितीच्या अधिकाराचा कायदा भारत सरकारने लागू केला. माहिती तंत्रज्ञानाचा व्यावसायिक क्षेत्रामध्ये परिणामकारक उपयोग केला जातो.

* दृश्य पेठ्या - बँक आणि बँकेचे ग्राहक किंवा खातेदार या दोहोमध्ये महत्वाचा दुवा म्हणून हे माध्यमच आहे.

* घरगुती बँका - होम बँकिंग अशा प्रकारच्या बँका आर्थिक सुख सुविधा उपयोग माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.

* ई. डी. आय [ EDI - Electric Data Interchanged ] - या सुविधेद्वारे आपण बँकेचे व्यवहार कागदाशिवाय पूर्ण करू शकतो.

* आर्थिक सेवा - सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार म्हणजे बिल वाटणे, पैसे ठेवणे, सर्व किरकोळ माहितीची देवाण घेवाण केल्या जाऊ शकते.


प्रसारमाध्यमे प्रयोगशाळा
* दिवसेंदिवस प्रगतीपथावर असलेल्या डिजीटल उपकरणामुळे भारत सरकारने MIT प्रयोगशाळा व USA यांच्या विद्यमाने संयुक्त प्रसारमाध्यम प्रयोगशाळा आशियाची उभारणी केली आहे.

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दिल्ली, चेन्नई, मुंबई, खरगपूर, कानपूर, या ठिकाणी संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात येत असून याद्वारे डिजिटल क्षेत्रात विकास घडवून आणायचा आहे.


विद्यावाहिनी
* सरकारी आणि सरकारी अनुदानावर सुरु असलेल्या शाळामधून निरनिराळ्या प्रमुख योजना राबविल्या जात आहेत.

* या संगणकीय प्रणालीअंतर्गत कार्यातून ७ जिल्ह्यातून १४० शाळामध्ये निरनिराळ्या प्रमुख योजना राबविल्या जात आहेत.

* आंध्र प्रदेशातील कुप्पम, गुजरात - गांधीनगर, झारखंड - हजारीबाग, पश्चिम बंगाल - दक्षिण चोवीस परगणा, महाराष्ट्र - परळी वैजनाथ, उत्तर प्रदेश - लखनौ, अलाहाबाद या सर्व जिल्ह्यात विद्यावाहिनीचे काम सुरु आहे.

* या सातही जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात एकशिक्षकीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.


ज्ञानवाहिनी
* देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी हा कार्यक्रम राबविला गेला आहे. त्या सर्व उच्च शिक्षण संस्थांच्या इंटरनेटच्या माध्यमातून परस्परातून जोडण्यात आलेल्या आहेत.

* देशातील बहुदेशीय शिक्षणाच्या प्रसाराचा हेतू त्यामध्ये आहे. त्यातील प्रत्येक संस्था विभाग, व्यवस्थापन, अर्थव्यवहार, वसतिगृह, ग्रंथालय, आणि प्रयोगशाळा परस्परांशी उच्च गतीच्या स्थानिक नेटवर्कने जोडण्यात आले आहे.

* पहिला पायलट प्रोजेक्ट दिल्ली विद्यापीठातून सुरु करण्यात आला. त्यामध्ये फायबर ऑप्टिक आधारित LAN सुरु करण्यात आले.

* उत्तर व दक्षिनेकडील क्षेत्र आवारातील सर्व प्रयोगशाळा, वर्ग, इमारती, कार्यालये संलग्न करण्यात आली आहे.


ई - कॉमर्स
* दोन निरनिराळ्या कंपन्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार इंटरनेटद्वारे होणे किंवा आपण आपल्या घरी बसून खरेदी करणे या इलेक्ट्रिक व्यापारी प्रकाराला ई कॉमर्स असे म्हणतात.

* ई कॉमर्स म्हणजेच इलेक्ट्रिक कॉमर्स होय. यामध्ये कॉमर्स या शब्दाचा अर्थ म्हणजे व्यापार असून तो इलेक्ट्रिक माध्यमातून केला जातो.

* या द्वारे सगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या ऑनलाईन स्वरुपात पाप्त केल्या जातात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.