भारताचे भौगोलिक विभाग


हिमालय पर्वत प्रदेश
जगातील सर्वात उंच अशी हिमालय पर्वतरांग भारतीय उपखंडाच्या उत्तर सीमेवर एखाद्या अभेद्य तटासारखी उभी असून त्यामुळे मुख्य आशिया खंडापासून भारतीय उपखंड भौगोलिक दृष्ट्या स्वतंत्र व वेगळे झाले आहे.हिमालय पर्वत रांग काश्मिरच्या उत्तर टोकापासून ते थेट पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरली आहे. भारताकडून तिबेटकडे जाताना हिमालायाकडून एकापुढे एक तीन पर्वतरांग आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत- शिवालिक टेकड्या, लेसर हिमालयाज, ग्रेटर हिमालयाज, ह्या टेकड्या आहेत.शिवालिक टेकड्या सर्वात दक्षिणेकडे गंगेच्या मैदानाला लागून असून उन्चीनेही बुटक्या आहेत. डेहराडून सारखी स्थळे याच टेकड्यामध्ये वसलेली आहे. या टेकड्यांच्या उत्तरेला सुमारे २,५०० ते ३००० मीटर उंचीची लेसर हिमालयाज रंग आहे. श्रीनगर, मसुरी, नैनीताल, ही थंड हवेची ठिकाणे याच रांगेत आहेत. याच भागात ग्रेटर हिमालयाज हि रांग असून ती सर्वात उंच म्हणजे ६,१०० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहे. हा भाग सतत बर्फाखाली असतो. हिमालयातील सर्व नद्यांचा उगम याच रांगेतून झाला आहे. झोजीला, नाथू-ला, सारख्या प्रसिद्ध खिंडीही याच रांगेत आहेत.

उत्तरेकडील मैदानी प्रदेश
हिमालयाच्या दक्षिण सीमेलगत गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, आणि सिंधू या प्रमुख नद्या आहेत. व त्यांच्या उपनद्यांनी मिळून राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, हि राज्ये मिळून सात लाख चौ कि मी इतका विस्तृत मैदानी प्रदेश निर्माण केला आहे. हा प्रदेश पश्चिमेकडील पंजाबपासून पूर्वेकडील आसामपर्यंत पसरलेला आहे. हिमालयातून वाहून आणलेल्या गाळानेच हा प्रदेश बनलेला असल्याने येथील जमीन अतिशय सुपीक आहे. सपाट व सुपीक जमीन असल्याने दोन तीन हजार वर्षापासून या भागात शेती केली जाते. त्यामुळे या भागात वस्ती खूप दाट आहे.

द्वीपकल्पीय पठारी प्रदेश
अरवली, विंध्य, सातपुडा, या पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश पसरलेला आहे. हा पठारी प्रदेश सलग नसून अनेक लहान मोठ्या पठारांनी बनलेल्या आहे. यातील दख्खनचे पठार सर्वात मोठे असून, माळवा, छोटा नागपूर, छत्तीसगढ हि इतर पठारे आहेत. पठारी प्रदेशाची उंची सरासरी ४०० मीटर आहे.हा पठारी प्रदेश पश्चिमघाट रांगांनी (सह्यान्द्री) तर पूर्वेकडे पूर्वघाट रांगांनी सिमित झाला आहे. या पठारी प्रदेशात विशेषतः छोटा नागपूर भागात विविध प्रकारची साधनसंपत्ती आहे. विपुल प्रमाणात आढळते. या पठारी प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे व आग्नेयेकडे आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता या प्रदेशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जातात.

पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश
भारताला पश्चिम आणि पूर्व अशा दोन किनारपट्ट्या आहेत. पश्चिम किनारपट्टी उत्तरेकडील कच्छ गुजरात पासून थेट कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. पश्चिम किनारपट्टी जेमतेम ५० ते १०० कि मी रुंद असून पूर्वेकडे सह्यान्द्रीने सीमित केली आहे. या किनारपट्टीचा कोकण, मलबार अशी स्थानिक नवे आहेत. पूर्व किनारपट्टी कन्याकुमारी पासून पश्चिम बंगाल पर्यंत पसरलेली आहे. ही किनारपट्टी अधिक रुंद म्हणजे १०० ते १५० कि मी आहे. गंगेसह दक्षिण भारतात उगम पावणाऱ्या सर्व नद्यांचे त्रिभुज प्रदेश याच किनारपट्टीत आहेत.

1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.