महाराष्ट्र : वाडःमय, साहित्य, चित्रपट

प्राचीन मराठी वाडःमय [रचनाकार व रचना]
* अज्ञानदास किंवा अगिनदास - अफझलखानाचा पोवाडा
* अनंत फंदी - श्रीमाधवनिधन ग्रंथ, कटाव व फटका ह्या रचना
* संत एकनाथ - चतुःश्लोकीं भागवत, एकनाथी भगवत, भावार्थ रामायण, रुख्मिणी स्वयंवर, एकनाथांची ज्ञानेश्वरी ही पहिली संशोधित प्रमाणसंहिता तयार केली.
* संत तुकाराम - मंत्रगीता, सुमारे ४००० अभांगाचा समावेश असणारी तुकाराम गाथा.
* दासो पंत - पदार्पण, गीतार्णव, पंचीकरण.
* संत नामदेव - आदी, तीर्थावली, समाधी तीन प्रकारचे ज्ञानेश्वरचरित्र.
* महिंद्र व्यास - म्हाइंभट - लीळाचरित्र मराठीतील पहिला आद्यग्रंथ आहे.
* मुकुंदराज - मराठीतील आद्यकवी - विवेकसिंधू, परमामृत, पवनविजय, मूलस्तंभ.
* मोरेश्वर रामजी पराडकर उर्फ कवी मोरोपंत - आर्याभारत, मंत्ररामायन, केकावली, सीतागीते, मंत्रभागवत, रुख्मिणीगीत, मराठी समश्लोकी गीत.
* रघुनाथ पंडित - दमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष, रामदासवर्णन ही काव्ये.
* संत रामदास - दासबोध, सुंदरकांड, मनाचे श्लोक, करुणाष्टके, अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे.
* संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ अभंग गाथा.


प्राचीन मराठी वाडःमय
* अनंत काणेकर - थँक्यू मिस्टर ग्लाड, हमीदबाईची कोठी, पुत्रकामेष्टी, कादंबरी - डोंगर म्हातारा झाला, अकरा कोटी गॅलन पाणी.
* अरुण कोल्हटकर - अरुण कोल्हटकरांच्या कविता, सर्पमित्र, चिरीमिरी, काला घोडा, भिजकी वही.
* इंदिरा संत - गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मृगजळ, मेंदी, शेला, वंशकम, मृण्मयी,
* ऊध्वव शेळके - धग, महापाप, जायबंदी, म्हणून, अगतिका, साहेब, बाईविना बुवा.  कथा - बिंदिया, उमरखा कुलकर्णी, उमलली कळी, वानगी.
* कृष्णाजी केशव दामले [ केशवसुत ] - आधुनिक मराठी काव्याचे जनक, केशवसुतांची कविता, समग्र केशवसुत.
* ग दि माडगूळकर - काव्य - गीतरामायण, जोगिया, गीतगोपाल, कथा - कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती.
* गो नि दांडेकर - बया दार उघड, हरहर महादेव, दर्याभवानी, झुंझार माची, दास डोंगरी राहतो, शितू, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, माचीवरला बुधा, मृण्मयी, मोगरा फुलला, पवनाकाठचा धोंडी, आम्ही भगीरथाचे पुत्र.
* गोविंद वि. करंदीकर उर्फ - विदा करंदीकर - स्वेदगंगा, मुदगंध, धृपद, जातक, वीरूपिका, संहिता, अष्टदर्शने.
* त्रयंबक बापूजी ठोंबरे [उर्फ बालकवी]  - बालकवींची समग्र कविता, मधुगीते.
* ना. धो. महानोर - रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता, प्रार्थना दयाघना, पक्ष्यांचे लक्ष, थवे, अजिंठा, पळसखेडची गाणी.
* नागनाथ कोतापल्ले - काफिला, संदर्भ, कर्फ्यू, आणि इतर कथा.
* नारायण सीताराम फडके - कादंबरी - अल्ला हो अकबर, कुलाब्याची दांडी, अटकेपार, वादळ, जादूगार, दौलत, शोनान, तुफान, अस्मान, झंझावात, जेहलम, कलंकशोभा.
* प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशव कुमार - झेंडूची फुले, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार जग काय म्हणेल. तो मी नव्हेच, बुवा तेथे बाया, डॉक्टार, मी मंत्री झालो, प्रीती संगम, मोरूची मावशी.
* पु. ल. देशपांडे - अंमलदार, सुंदर मी होणार, तुझे आहे तुझपाशी, तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी, विनोद - खोगीरभरती, नस्ती उठाठेव, बटाट्याची चाळ, हसवणूक, गोळाबेरीज, मराठी वाड्यमयाचा इतिहास. व्यक्तीचित्रे - व्यक्ती आणि वल्ली.
* बा. भ. बोरकर - जीवनसंगीत, दूधसागर, आनंदभैरवी, चित्रवीणा, गितार, चैत्रपुनव, कांचनसंध्या, अनुरागीनी.
* बा. सी. मर्ढेकर - शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, मर्ढेकरांची कविता.
* भालचंद्र नेमाडे - कोसला, बिढार, झूल, जरीला, हूल, हिंदू
* महेश एलकुंचवार - गार्बो, पार्टी, वाडा, चिरेबंदी, वासना कांड, रुद्रवर्ण, रक्तपुष्प, आत्मकथा आणि प्रतिबिंब.
* मंगेश पाडगावकर - धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, वात्रटिका, भटके, पक्षी, नवा दिवस, कबीर, उदासबोध, राधा, गिरकी, निंबोणीच्या झाडामागे.
* माधव त्रयंबक पटवर्धन - उर्फ माधव ज्युलियन - उमर खय्यामकृत रुबाया, गज्जलांजली, तुटलेले दुवे.
* माणिक गोडघोटे - उर्फ ग्रेस - चंद्र माधवीचे प्रदेश, संध्यकाळच्या कविता, साध्यपर्वतातील वैष्णवी, राजपुत्र आणि डार्लिंग, सांजभयाच्या साजणी.
* मिलिंद बोकील - शाळा, समुद्र, झेन गार्डन.
* यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत - पाणपोई, यशोगंध, यशोधन, जयमंगल, यशोधिनी, शिवराय, बंदिशाला.
* रणजित देसाई - स्वामी, रामशास्त्री, हे बंध रेशमाचे, कांचनमृग. कादंबरी - स्वामी, राजा रविवर्मा, अभोग, श्रीमान योगी, बारी, राधेय.
* राम गणेश गडकरी - उर्फ गोविंदाग्रज - प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राजसंन्यास, वेड्यांचा बाजार.
* व. पु. काळे - घर हरवलेली माणसं, स्वर झोपाळा कर्मचारी, तप्तपदी, प्लेझर बॉक्स, मायाबाजार, हुंकार, रंगपंचमी, वलय, कॅलेंडर, पार्टनर
* वसंत शंकर कानेटकर - वेड्याचे घर उन्हात, प्रेम तुझा रंग कसा, रायगडला जेव्हा जग येतो, येथे ओशाळला मृत्यू, गगनभेंदी, तुझा तू वाढवी राजा, विषवृक्षाची छाया, हिमालयाची सावली, मत्स्यगंगा, लेकुरे उदंड जाली, जेथे गावाला भाले फुटतात. अश्रूंची झाली फुले, तू तर चाफेकळी, बेईमान, वादळ माणसाळतंय.
* विठ्ठल वाघ - पंढरीच्या वाटेवर, साय, वैदर्भी, काया मातित मातीत, डेबू
* विश्वास पाटील - पानिपत, पांगिरा, झाडाझडती, महानायक, संभाजी.
* विष्णू वामन शिरवाडकर [ कुसुमाग्रज ] - जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, महावृक्ष, मुक्तायन प्रवासी पक्षी, छंदोमयी, पाथेय, अक्षरबाग, थांब सहेली, नाटक - दुसरा पेशवा, कौंतेय, ययाती, देवयानी, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, नटसम्राट.
* विष्णू सखाराम खांडेकर - उल्का, दोन ध्रुव, पांढरे ढग, क्रौंचवध, हिरवा चाफा, कांचनमृग, अमृतवेल, ययाती, अश्रू, सुखाचा शोध,
* शिवाजी सावंत - मृत्यूजय, युगंधर, छावा, संभाजी.


प्रमुख आत्मचरित्रे
* आत्माराम भेंडे - अत्मरंग
* आनंदीबाई शिर्के - सांजवात
* काका कालेलकर - स्मरणयात्रा
* प्रबोधनकार ठाकरे - पनवेल
* गो नि दांडेकर - स्मरणगाथा
* गंगाधर गाडगीळ - एका मुंगीचे महाभारत
* चिंतामणराव कोल्हटकर - बहुरूपी
* ना सी फडके - माझे जीवन एक कादंबरी
* पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी - श्यामची आई
* बाबुराव पेंढारकर - चित्र आणि चरित्र
* यशवंतराव चव्हाण - कृष्णाकाठ
* विठ्ठल कामत - इडली ऑर्किड आणि मी
* विठ्ठल रामजी शिंदे - माझ्या आठवणी व अनुभव
* वि द घाटे - दिवस असे होते.
* विनायक दामोदर सावरकर - माझी जन्मठेप
* व्ही शांताराम - शांतारामा
* शांता शेळके - धूळपाटी


मराठी साहित्यिक व टोपणनावे
* आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
* काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
* कृष्णाजी केशव दामले - केशवसूत
* गोपाळ नरहर नातू - मनमोहन
* गोविंद त्रयंबक दरेकर - गोविंद
* गोविंद विनायक करंदीकर - विदा करंदीकर
* चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे - चंद्रशेखर
* चिंतामण त्रयंबक खानोलकर - आरती प्रभू
* त्रयंबक बापूजी ठोमरे - बालकवी
* नारायण मुरलीधर गुप्ते - बी
* प्रल्हाद केशव अत्रे - केशव कुमार
* पंढरीनाथ गोपाळ रानडे - फिरोझ रानडे
* माधव त्रयंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
* माणिक गोडघाटे - ग्रेस
* यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत
* राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
* विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
* शंकर केशव कानेटकर - गिरीश
* श्रीधर कृष्ण कुलकर्णी - पट्ठेबापुराव
* निवृत्ती रावजी पाटील - पी. सावळाराम
* राम गणेश गडकरी - बाळकराम


महाराष्ट्र : मराठी चित्रपट
* संत तुकाराम उर्फ जय हरी विठ्ठल हा पहिला मराठी चित्रपट आहे.
* अयोध्येचा राजा हा प्रभात फिल्म कंपनीचा पहिला बोलपट आहे.
* श्यामची आई सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पाहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळविणारा पहिला मराठी चित्रपट.
* श्वास हा राष्ट्रपती सुवर्णपदक चित्रपट ऑस्कर मध्ये जो भारताचे प्रतिनिधित्व करणारा पहिला मराठी चित्रपट आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.