महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

खनिजसंपत्ती - महाराष्ट्रातील संपत्ती
महराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी १२.३३% एवढ्या भागातच खनिज संपत्ती आहे. राज्यातील बरीच खनिज संपत्ती ही बे-साल्टच्या व स्फटिकरुप्या खडकात मिळते.

महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीची प्रमुख क्षेत्रे- पूर्व विदर्भात चंद्रपुरात, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, तसेच कोकणात व दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यात आढळते.

* बॉक्साइट - महाराष्ट्रात बॉक्साइट चे साठे हे कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापुरात साठे आहेत.

* मगनीज -   महराष्ट्रात याचे साठे भांडारा, नागपूर जिल्ह्यात आहेत. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.

* लोहखनिज - महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, व
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते.

* तांबे - अल्प साठे महाराष्ट्रात तांब्याचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात आहेत.

* क्रोमाईट - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी  या ठिकाणी आहेत.

* जिप्सम -पुणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिप्सम चे साठे आहेत.

* डोलोमाईट - विदर्भात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात डोलोमाईट चे साठे
आढळतात.

* चुनखडी - पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे त्याच प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चुनखडीचे साठे आढळतात.

* अभ्रक - पूर्व विदर्भात अभ्रकाचे साठे गडचिरोली जिल्ह्यात आढळतात.

* इल्मेनाइट - चे साठे रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात.

* बेराइट - प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात.

* गारगोटी - याचे साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.

* सिलीकायुक्त वाळू - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सिलीकायुक्त वाळू आढळते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.