त्रिमंत्री मंडळ


* जुलैमध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका होऊन इंग्लंडमधील हुजूर पक्ष पराभूत होऊन तेथे मजूर पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. हिंदुस्तानला स्वतंत्र देणे  मजूर पक्षाचे उदिष्ट होते.

* मजूर पक्षाच्या या उदिष्टाला अमेरिकेने देखील आपली सहानुभूती दाखवली होती. तेव्हा मजूर पक्षाच्या पार्लमेंटमध्ये १९ मार्च १९४६ रोजी पंतप्रधान अटलीने हिंदुस्तानला शक्य तितक्या लवकर स्वतंत्र देण्याची आवश्यकता दर्शविली.

* परंतु मुख्य प्रश्न असा होता तो भारत पाकिस्तान फाळणीच्या समस्येसाठी पंतप्रधान अटली यांनी आपल्या मंत्रिमंडळातील १] सर पेथिक लॉरेन्स २] सर स्टफर्ड क्रिप्स ३] मी अलेक्झांडर यांचे शिष्टमंडळ भारतात पाठविले.

* राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यात तोडगा न निघाल्याने १६ मे १९४६ रोजी त्रीमंत्री मंडळाने आपल्या शिफारशी जाहीर केल्या.

त्रिमंत्री मंडळाच्या शिफारशी
* ब्रिटीश प्रांत व हिंदी संस्थाने मिळवून एक संघराज्य तयार करावे, व या संघराज्याकडे संरक्षण व दळणवळण परराष्ट्र हि खाती असावी.

* ब्रिटीश, भारतात व हिंदी संस्थानिकांच्या प्रतिनिधीचे मिळून कार्यकारी व कायदे मंडळ असावे.

* प्रांताचे तीन विभाग पाडून त्यांना स्वतंत्र घटना तयार करण्याचा अधिकार द्यावा.

* घटना तयार करण्यासाठी एक स्वतंत्र घटना समिती निर्माण करावी.

* संघराज्याचा अधिकार क्षेत्रात विषय आहेत ते विषय सोडून इतर विषयावर कायदे करून त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार घटक राज्य सरकारला असावा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.