पदार्थाचे गुणधर्म


पदार्थाचे गुणधर्म
* उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. उदा तांबे सोने चांदी.

* उष्णता वाहून न नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थाला उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. उदा प्लास्टिक, अर्सिलिक, रबर.

* विज वाहून नेणाची क्षमता नसलेल्या पदार्थाला विजसुवाहक म्हणतात उदा . अल्युमिनिअम, तांबे.

* वीज वाहून नेण्याची क्षमता नसलेल्या पदार्थाला विजदुर्वाहक म्हणतात. उदा लाकूड, प्लास्टिक, रबर,

* चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या पदार्थाला चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदा. कोबाल्ट, निकेल, लोखंड,

परिवर्तनीय बदल, भौतिक बदल
पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना येणाऱ्या परिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदा. मेणबत्तीचे वितळणे. दुधाचे दही होणे.

आवर्ती अनावर्ती बदल

* ठराविक कालावधीनंतर जे बदल पुन्हा पुन्हा घडून येतात. त्यांना आवर्ती बदल असे म्हणतात. जसे घडाळ्याचे काटे.

* वादळ होणे, भूकंप, लाटांची निर्मिती, पुन्हा पुन्हा घडणाऱ्या बदलातील कालावधी समान नसल्यास अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात.
भौतिक बदल

* जे बदल घडताना मूळ पदार्थ तोच राहतो, नवीन पदार्थ निर्माण होत नाही. अशा बदलांना भौतिक बदल असे म्हणतात.

* पाण्याची वाफ झाल्यावर द्रवाचे बाष्प होणे या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.

* सांद्रीभवन - उष्णतेने पाण्याची वाफ होणे, वाफ थंड झाल्यावर पुन्हा तिचे पाणी बनणे या भौतिक बदलामुळेच पाऊस पडतो. उष्णतेमुळे द्रवाची वाफ होणे याला बाष्पीभवन म्हणतात याउलट
तिच्यापासून पुन्हा द्रव बनणे याला सांद्री भवन असे म्हणतात.

* उत्कलन - पाणी, दुध, तेल या पदार्थांना पुरेशी उष्णता दिली कि ते उकळू लागतात उकळणे म्हणजे उत्कलन होय.

* विलयन - उष्णता दिल्याने काही पदार्थ स्थायू अवस्थेतून द्रव रुपात जातात. यालाच पदार्थाचे वितळणे विलयन असे म्हणतात

* रासायनिक बदल - लाकूड जळणे, आधीच्या पदार्थापासून नवीन वेगळा पदार्थ बनतो. अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात. नवीन पदार्थ तयार होणे म्हणजे रासायनिक बदल होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.