भारतातील नदी प्रणाली


हिमालयीन नद्या - गंगा नदीप्रणाली, सिंधू नदीप्रणाली, ब्रम्हपुत्रा नदीप्रणाली.
पठारावरील नद्या - पूर्ववाहिनी नद्या, पश्चिमवाहिनी नद्या,

नदी           उगम                        लांबी (कि मी)  कोणत्या समुद्रास व नदीस मिळते
गंगा           गंगोत्री, उत्तरांचल               २,५१०    बंगालच्या उपसागरात बांगलादेशातील
यमुना        यमुनोत्री, उत्तरांचल             १,३००   गंगा नदीस, अलाहाबाद
घाग्रा         गंगोत्रीच्या पूर्वेस                   १०८०     गंगा नदीस बिहार राज्यात पाटण्याजवळ
कोसी       तिबेट नेपाळ सरहद्दीवर         ७३०       गंगा नदीस, बिहार राज्यात
दामोदर     तोरी(छोटा नागपूर पठार)      ५४१        हुगळी नदीस
गंडक        मध्य हिमालय                     ४२५        गंगा नदीस
सिंधू         तिबेटमध्ये मानस                २,९००     अरबी समुद्रास
                सरोवराजवळ
झेलम        पीरपंजाल टेकड्या वैरीनाग    ४००      सिंधू नदीस, पाकिस्तानमध्ये
चिनाब      हिमालय पर्वतात हि प्र           १,८००   सिंधू नदीस पाकिस्तान मध्ये
रावी         कुलू टेकड्यामध्ये                 ७२५      सिंधू नदीस, पाकिस्तान मध्ये
बियास      कुलू टेकड्यामध्ये                 ४७०      सतलज नदीस
सतलज    तिबेट, राकस सरोवराजवळ     १,०५०   सिंधू नदीस, पाकिस्तान मध्ये
ब्रह्मपुत्रा     चेमायुंगडंग खोऱ्यात तिबेट       २९००   गंगा नदीस, बांगला देशात
नर्मदा        अमरकंटक, शहडोल म प्र       १,२९०   अरबी समुद्रास भूरुचजवळ
तापी         मुलताई बैतुल, म प्र                ७२४      अरबी समुद्रास
साबरमती  जयसमूद्र सरोवर उदयपुर         ४१६      अरबी समुद्रास
गोदावरी    त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र       १४५०    बंगालच्या उपसागरात
कृष्णा       महाबळेश्वर सातारा                 १,२९०   बंगालच्या उपसागरात
महानदी    सिहावा रायपुर छत्तीसगढ          ८९०       बंगालच्या उपसागरास
कावेरी     ब्रम्हगिरी कुर्ग कर्नाटक              ७६०       कावेरी पट्टणमजवळ

भारतातील नद्याविषयी महत्त्वाच्या टिपा -

* भागीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी असे म्हणतात असे संबोधतात. भागीरथी हा गंगेचा मूळ मुख्य  प्रवाह मानला जातो. भागीरथी चा उगम गंगोत्री येथे होतो. त्यामुळे गंगेचे उगमस्थान गंगोत्री आहे. असे म्हटले जाते.  अलकनंदेचा उगम अलकापुरी येथे होतो. अलकनंदा व भागीरथी हे दोन प्रवाह ' देवप्रयाग ' येथे एकत्र येतात.

* ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमधून त्सांगपो नावाने वाहते. अरुणाचल प्रदेशात दिहांग येथे ती भारतात प्रवेश करते. भारतीय हद्दीत प्रवेश करताना तिला दिबांग व लोहित या नद्या मिळतात. या नद्यांचा एकत्रित प्रवाह ब्रम्हपुत्रा नावाने ओळखला जातो.

* ब्रम्हपुत्रा नदीची एकूण लांबी २,९०० कि मी असली तरी तिचा फक्त ८८५ कि मी लांबीचा प्रवाह भारतातून जातो.

* सिंधू आणि ब्रम्हपुत्रा या दोन्ही नद्यांची एकूण लांबी गंगेपेक्षा अधिक असली तरी या दोन नद्यांच्या भारतातील प्रवाहाची एकूण लांबीपेक्षा कमी असल्याने गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी ठरते.

* सिंधू नदीचा एकूण प्रवाह २,९०० कि मी लांबीचा असला तरी त्यापैकी फक्त ७०९ कि मी लांबीचा प्रवाहास भारतातून जातो.

* गंगा नदी सिंधू नदीपेक्षा लांबीने कमी आहे. सिंधू व ब्रह्मपुत्रा नद्यांनी लांबी जवळजवळ सारखी आहे. परंतु ब्राम्ह्पुत्रेचा बराचसा प्रवास तिबेटमधून म्हणजे भारतीय उपखंडाबाहेर होत असल्याने सिंधू हि भारतीय उपखंडातील सर्वात लांब  नदी ठरते.

* गंगेचे खोरे हे आकारमानातील भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. त्याखालोखाल गोदावरी खोऱ्याचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.

* गंडक नदीस नेपाळमध्ये 'नारायणी' या नावाने ओळखले जाते.

* जेथून साबरमतीचा उगम होतो ते जयसमुद्र सरोवर अरवली पर्वतरांगामध्ये आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.