एड्स

एड्सचे स्वरूप
* Acquuired Immuno Deficiency Syndrome [AIDS] - या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोगाची लागण डिसेंबर १९९६ पर्यंत २ कोटी ९० लाख लोकांना झालेली होती.

* लैंगिक संबंधाद्वारे कळत नकळत या रोगाने विषाणू व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. सामान्यपणे एड्सचे विषाणू शरीरामध्ये गेल्यानंतर पहिली ८ ते १० वर्षे कोणत्याही प्रकारे बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत.

* सध्या या रोगाच्या ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस HIV विषाणूचा नाश करण्यासाठी कोणतेही औषध नाही किंवा त्यासाठी कोणतेही प्रतिबंधक लस तयार झालेली नाही.


एड्सची लक्षणे
* एड्सची लागण झालेल्या व्यक्तीस एक महिन्यापेक्षा जास्त काळ सतत ताप येत असतो.

* एड्स झाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्या व्यक्तीचे वजन कमी कमी होत जाते.

* एड्स झालेल्या व्यक्तिंस संडास आवेगाने होत असते. त्याला शौचास त्रास होतो.

* काही व्यक्तींना एड्समधून मेंदूज्वर होतो आणि त्याच्या हाता पायातील शक्ती एकदम कमी होते. ती व्यक्ती अशक्त बनते.

* एड्स झाल्याबरोबर उलट्या होणे, थकवा येणे, भूक मंदावणे, अंगावर लाल पुरळ येणे, गळ्यातील आणि काखेतील गाठींना सूज येणे, घसा येणे, खोकला येणे, अशी लक्षणे दिसू लागतात.


एड्सची कारणे
* एड्सचे मुख्य कारण म्हणजे एच आय व्ही विषाणूंचा संसर्ग होणे हे होय. अर्थात एचआयव्ही विषाणूंचा संसर्ग लैंगिक संबंधातून मोठ्या प्रमाणात होत असतो.

* असुरक्षित लैंगिक संबंधद्वारे, एड्स संक्रमित गरोदर मातेकडून नवजात बालकास.

* HIV बाधित रोग्यापासून उपयोगात आणलेल्या इंजेक्शन सुईद्वारे होते.

* एच. आय. व्ही. बाधित रुग्णाच्या रक्तदानाद्वारे एड्स होऊ शकतो.


प्रतिबंध
* परस्त्रीशी - पुरुषाशी लैंगिक संबध येवू देवू नयेत, सर्व प्रकारच्या व्यसनापासून, वाईट सवयीपासून दूर राहावे.

* असंरक्षित अनोळखी संबंध ठेवू नयेत, मासिक पाळीच्या वेळी असंरक्षित संभोग अयोग्य आहे.

* सुरक्षित लैंगिक संबंधाचाच विचार व्हावा, तसेच जोखमीची लैंगिक वर्तणूक असलेल्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबध टाळावेत.


एड्स पुढील कारणाने होत नाही
* एड्सग्रस्त व्यक्तीबरोबर किंवा त्याच्या ताटात जेवण केल्यास.
* एड्सग्रस्त व्यक्तीशी हस्तांदोलन केल्यास, स्पर्श केल्यास.
* एड्सग्रस्त व्यक्तीशी न्हाव्याकडून केस कापल्यास किंवा दाढी केल्यास.
* एड्सग्रस्त रुग्णाचे कपडे, बिछाना उपयोगात आणल्यास.
* एड्सग्रस्त व्यक्तीशी सर्वसाधारण संबंध ठेवल्यास.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.