राष्ट्रीय शेतकरी धोरण प्रमुख उदिष्टे

* एम. एस स्वामिनाथन यांनी शेतकऱ्या करिता व्यापक धोरण असावे अशी शिफारस केली होती. लक्षात घेवून २००७ मध्ये शरद पवार यांनी [ राष्ट्रीय कृषी धोरण ] जाहीर केले.

* शेतीची प्रगती केवळ उत्पादनवाढीतून मोजली जावे. त्यासाठी शेतकऱ्यांना नक्त उत्पादनात वाढ घडवून सक्षमता वाढविणे.

* उत्पादकता आणि उत्पादन यात सातत्याने वाढ करण्यासाठी जमीन, पाणी, जैवविविधता जतन करण्यासाठी शेतकऱ्यासाठी आर्थिक हितसंबंधात संवर्धन पक्रियेत वाढ करणे.

* शेतीला योग्य पाणी, बियाणे, सिंचन, वीज, खतपुरवठा अशा सुविधा पुरेशा व वाजवी किमतीच्या उपलब्द करणे.

* पिक, पशुपक्षी, मासे जंगल यांचे रक्षण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी किमंत व व्यापार पद्धती योग्य
यंत्रणा विकसित करणे.

* पुरेशी व वेळेवर योग्य नुकसानभरपाई यंत्रणा शेतकऱ्यांना देणे. कृषीव्यवस्थेतील धोरणात स्त्रियांना न्याय देने.

* शेतीमध्ये तरुण वर्ग आकर्षित करण्यासाठी मूल्यवर्धित, लाभदायी उद्योगांना प्रोत्साहन देणे.

* माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक स्तरावर निर्यातीत प्रमुख केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे.

* कृषी तंत्रज्ञ हे कृषी उद्योजक होतील यासाठी कृषी अभ्यासक्रमात बदल करणे,  सुरक्षितता वाढविणे, शेतीपूरक उद्योग जोड व्यवसाय वाढविणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.