प्रकाशचे संक्रमण व उष्णतेचे परिणाम



प्रकाशचे संक्रमण

प्रकाशाचे संक्रमण एका सरळरेषेत असते. याला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला आणि तिघेही एका सरळ रेषेत आले. कि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते अशा वेळी सूर्यग्रहण झाले असे म्हणतात.सूर्यग्रहण फक्त अमावशेच्या वेळी दिसते. ते आंशिक किंवा पूर्ण असते.
चंद्रग्रहण - सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर आणि तिघेही एका सरळरेषेत आले कि पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचा काही भाग झाकला जाते. त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहन पौर्णिमेलाच असते. तेव्हा ते आंशिक व पूर्ण असते.

परावर्तन 

* आपल्या घरातील आरसा नेहमी समतल असतो.
* प्रकाश किरण जेव्हा आरसाच्या पृष्ठभागावर पडतात. तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. त्याला परावर्तन  म्हणतात.

गोलीय आरसे
* जर गोल्याच्या बाह्य बाजूचे जतन केले तर आतील बाजूने प्रकाश परावर्तीत होईल. अशा आरशाला अंतर्वक्र आरसा म्हणतात.
* अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असे म्हणतात. बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात असेही म्हणतात.

अंतर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा
* अंतर्वक्र आरशावर वस्तू अनंत अंतरावरच्या नाभी केंद्र F वर अत्यंत लहान आकाराची व प्रतिमेची स्वरूप वास्तव व उलट दिसेल. 
* अंतरवक्र आरशावर वस्तू जर वक्रता केंद्र C आणि अनंताच्या मध्ये F आणि C  मध्ये प्रतिमेचा आकार जर लहान असेल तर वस्तू वास्तव उलट दिसते.
* अंतर्वक्र आरशासमोर आरशाच्या मागे प्रतिमेचा आकार विशाल आकार आभासी व सुलट दिसते.


बहिर्वक्र तयार होणाऱ्या प्रतिमा
* बहिर्वक्र आरशाने कोणताही वास्तव वस्तूची तयार झालेली प्रतिमा नेहमी आभासी उलटी व सुलट आणि वस्तूपेक्षा लहान आकाराची असते.
* बहिर्वक्र आरशाने अनंत अंतरावर जर वस्तूची जागा नाभी  असेल तर आकार अत्यंत लहान स्वरूप आभासी व सुलट होईल.
* प्रतिमेचा आकार लहान आणि स्वरूप आभासी व सुलट आहे.
* वाहनाच्या चालकाच्या मागची  बघण्यासाठी बहिर्वक्र आरसा वापरतात. त्यामुळे प्रतिमा वस्तूपेक्षा लहान व सुलट तयार होतात.
* दाढी करताना आरसा अंतर्वक्र असतो. त्या आरशातील प्रतिमा सुलट व मोठी दिसते.
* सौरतापात, शोधदीप आणि खाईत वापरणाऱ्या यांच्याजवळ अंतर्वक्र आरसा असतो.


उष्णता 

पृथ्वीला प्रारणाच्या स्वरुपात सूर्यापासून उष्णता मिळते. सूर्याच्या केंद्रकाचे तापमान १०k केलव्हीन आहे.सूर्यामध्ये केंद्रकीय एकीकरण पद्धतीने सूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते.

उष्णतेचे परिणाम

* ज्या तापमानावर स्थायुचे द्रवात अवस्थांतर त्यास त्या पदार्थाचा द्रवनांक म्हणतात.

* ज्या तापमानावर द्रवाचे वायूत अवस्थांतर होते त्यास त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात.
पदार्थ       द्रवनांक    उत्कलनांक
पाणी           ०'      १००'
लोह        १५३५'    २७५०'
तांबे        १०८२'    २३१०'
शिसे         ३२७'     १७४०'
पारा         -३९'      ३५७'

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.