सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत सहभाग व संघटना

राष्ट्रीय जलविद्युत कॉर्पोरेशन लिमिटेड [ NHPC ]
* १५,००० कोटी रुपये भांडवलाचा प्रकल्प भारत सरकारच्या [ अ ] श्रेणी व लघुउद्योगामध्ये आहे. पूर्वी तो राष्ट्रीय जलविद्युत निगम लिमिटेड  नावाने ओळखला जात असे.

* मे १९७५ स्थापन करण्यात आलेल्या हा प्रकल्प आता विशालकाय बनले आहे.

* निरनिराळ्या जलविद्युत योजना प्रकल्प तयार करणे, भारतामध्ये आणि परदेशामध्ये पारंपारिक आणि अपारंपरिक माध्यमातून वीजनिर्मिती करणे यासारखे कार्य NHPC मधून केले जाते.

राष्ट्रीय औष्णिक विद्युत कॉर्पोरेशन [ NTPC ]
* सन १९७५ मध्ये अस्तित्वात आलेल्या या कंपनीचे दोन वेळा नामकरण झालेले आहे.

* मार्च २००९ अखेर वीज उत्पादन १८.८२% होते. सध्या उत्पादन क्षमता ३०,६४४ mv एवढी आहे.

* हि कंपनी भारत सरकारच्या एका नवरत्न कंपनीपैकी आहे. कोळसा ब Gas या दोन्हीवर आधारित कंपनी आहे.

भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प
* भारतामध्ये १९ शतकाच्या शेवटी दार्जीलिंग येथे १३० KV क्षमतेचे पहिले जलविद्युत केंद्र सुरु झाले.

* भाक्रा नांगल योजना - सतलज नदीवर हि जलविद्युत केंद्र निर्माण करण्यात आले.

* दामोदर योजना - हि योजना अमेरिकेतील टेनेसी खोरे योजनेवर आधारित आहे. त्या योजनेतून ४ जलाशय एकत्र आहेत.

* हिराकूड प्रकल्प - महानदीवरील संबलपूर जिल्ह्यात हि योजना पूर्ण करण्यात आली असून त्यावर जल विद्युत प्रकल्प आहे.

* कोयना प्रकल्प - कोयना नदीवर ही योजना पूर्ण करण्य्यात आली. या योजनेद्वारे मुंबई - पुणे परिसरात वीजपुरवठा करण्यात येतो.


राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
* एप्रिल २००५ मध्ये ग्रामीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या या योजनेसाठी ग्रामीण भागात ९०% सबसिडी देण्यात येते.

* प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्य ट्रान्समिशन पद्धतीने एकत्रित स्वरुपात ३१११ किंवा ६६४४ KV आधारित ग्रामीण विद्युत वितरण आधार तंत्राची निर्मिती करावी.

* विजेसाठी दुर्लक्षित केलेल्या सर्व गाव आणि वस्त्यासाठी ग्रामीण विद्युतव्यवस्थेची निर्मिती तसेच प्रत्येक गाव व वस्तीसाठी आवश्यक क्षमतेच्या वितरण ट्रान्सफार्मरची व्यवस्था करणे.

* ज्या गावात व वस्त्यात विद्युत पुरवठा फायदेशीर नाही. आणि अपारंपरिक उर्जास्त्रोत उपलब्द करून त्या ठिकाणी पारंपारिक साधनाद्वारे विद्युतचा विकेंद्रित स्वतंत्र उत्पादन व पुरवठा व्यवस्था करणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.