वंचित किंवा विशिष्ट गटाचे शिक्षण


मुलींचे शिक्षण - महत्व व समस्या
* एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण ५०% असले तरीही सर्व स्तरावरील स्त्रियांवर शिक्षणाबाबत अन्याय झालेला दिसतो.

* जर स्त्री शिकली तर मुख्यत्वे मानवी भांडवल समृद्ध होईल. तसेच एकूण सामाजिक व्यक्तिमत्व स्त्री-शिक्षणातून वृद्धिगत होईल.

* सामाजिक दृष्टीकोन - भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले आहे. परिणामी शिक्षणातही त्यांना दुय्यम स्थान दिले आहे.

* कौटुंबिक कामे असल्याने बऱ्याच स्त्रिया शिक्षणास वेळ देवू शकत नाहीत.

* बालविवाह या प्रथेमुळे लवकर लग्न झालेल्या मुलीला घरची जबाबदारी असल्यमुळे शिकायला मिळत नाही.

* मुला-मुलींच्या एकत्रित शिक्षणास अद्यापि काही पालकांचा विरोध नाही.

* दारिद्रयामुळे असल्यामुळे मुलीना शिक्षण शिकविल्या जात नाही.
शासकीय उपक्रम

* मध्यांत भोजन योजनेचा परिणाम मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणावर अधिक अनुकूल झालेला दिसतो.

* सामाजिक प्रबोधन जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

* मुलींना १२ वी पर्यंतच्या शिक्षण फीमध्ये सवलत दिली आहे.

* कपडे, वह्या, पुस्तके मोफत दिली जातात.

* गरीब पालकांना उपस्थिती भत्ता सुरु केला आहे.

* सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबविली जात आहे.

* मुलीकरिता स्वतंत्र तंत्रनिकेतने स्थापन केली जातात.

* शिष्यवृत्त्या खास मुलीसाठी दिल्या जातात.


अपंगाचे शिक्षण
अपंगाच्या शिक्षणातील अडचणी व समस्या * आपल्या देशात अपंगाची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे त्यांना सोई उपलब्द नाहीत.

* अपंगाच्या संख्येत त्यांना प्रमाणात त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्था व शाळांचे प्रमाण फारच कमी आहे.

* अपंगाना शिक्षण देणारे व घेणारे हे दोघेही निराशावादीच असतात.

* सुविधा व साधनाचा अभाव आहे.

* अपंगाबाबत असलेल्या कायद्याच्या बाबतीत उदासीनता आहे.

अपंगांच्या शिक्षणासाठी शासकीय योजना
केंद्रशासनाची अपंग एकात्म शिक्षण योजना

* १९७६ साली संयुक्त राष्ट्रसंघाने अपंग वर्षाच्या निमित्ताने अपंगाना विशेष शाळेतून शिक्षण देण्याएवजी सामाण्य शाळेतून शिक्षण द्यावे अशी शिफारस केली.

* भारतातदेखील अपंगाच्या खास शाळा होत्या परंतु त्या शाळा ह्या शहरापुरत्याच होत्या, पण यातून अपंगाचे सामाजिक स्थान दुय्यम राहत असे.

* हे दूर करण्यासाठी अपंग एकात्म शिक्षण सुविधा दिल्या जातात. महाराष्ट्रात हि योजना प्राथमिक शिक्षण संचानालयाकडून राबविली जाते. यामध्ये ८ मुलांचे एक असे युनिट मानले जाते.

* अनुदानप्राप्त शाळांना हि योजना लागू होते. या योजनेंतर्गत अपंगासाठी उपकरणे घेण्यासाठी २००० रुपये, वह्या ४००, गणवेश २०० एवढे रुपये दिले जातात.


मागासवर्गीय समाजाचे शिक्षण
* मागासवर्गीय समाजामध्ये पुढील उपवर्ग आहेत अनुसूचित किंवा वर्गीकृत जाती, अनुसूचित जमाती किंवा आदिवासी भटके, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले, अपंग, स्त्रिया.

* स्वतंत्रपूर्व काळात मुंबई राज्यातील स्टार्ट कमिशनने मागासवर्गीयांना इतरांच्या बरोबरीने शिक्षण दिले जावे यासाठी शिफारशी केल्या.

* मागासवर्गीय समाजातील अधिक मागासलेला व दुर्बल घटक म्हणजे आदिवासी समाज होय. एकाच पुर्वाजापासून उत्पत्ती सांगणारे, रक्तसंबध यांच्यावर आधारित सामाजिक व राजकीय रीतीरिवाज पाळणारे, एकाच विशिष्ट भू प्रदेशात राहणारे लोक म्हणजे आदिवासी होय.

* नागरी वस्तीपासून सूर राहणाऱ्या आदिवासींना अनुसूचित जमाती असे म्हणतात. हे लोक जंगलात राहत असल्याने त्यांना वनवासी असे म्हणतात. तसेच जे डोंगरदऱ्यात राहतात त्यांना गिरीजन असे म्हणतात.

* महाराष्ट्रात कातकरी, डांगी, मावची, तडवी, पाडवी, सावा, परधान, दुबळे, धोडिया, आणि नायक जमाती सह्यांद्रीच्या डोंगर भागात राहतात.

* तर पश्चिम महाराष्ट्रात ठाकूर, महादेव कोळी, विदर्भात कोरकू, तर वारली, कोळी, कोकणी या जमाती ठाणे, रायगड, नाशिक भागात दिसतात. सातपुड्याच्या परिसरात भिल्ल, व हरिजन आहेत.
मागासवर्गीयांच्या शैक्षणिक समस्या

* अंधश्रद्धा - आदिवासी समाजात भूत - भानमातीची विद्या प्रामुख्याने स्त्रिया शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण द्यावे लागते.

* अज्ञान - या समाजात आई व वडील अज्ञान असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात.

* दारिद्र्य, अंतर, शिक्षकाची कमतरता, अभ्यासक्रम व शाळेची वेळ, कुपोषण यामुळे त्यांना शिक्षणात समस्या येतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.