भारताचे कुत्रिम उपग्रह

भारताचे कुत्रिम उपग्रह
* मानवाद्वारे अवकाशात पहिला यांत्रिक उपग्रह १९५७ साली रशियाद्वारे सोडण्यात आला. आणि येथूनच या युगाची सुरवात झाली.

* खरी सुरवात १६ मे १९२६ रोजी गसोलीन व द्रवरूप पाण्यावर चालणारा जगातील पहिला अग्निबाण तयार झाला.

* अमेरिकेतील नासा अंतराळ संस्थेने सन १९६० मध्ये टिरॉस या उपग्रह मालिकेतील पहिला उपग्रह पाठविला होता.


उपग्रहाचे उपयोग
* उपग्रहाच्या उपयोगामध्ये अतिशय महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्याद्वारे हवामानाचा अभ्यास करण्यास मदत होते. हवामानाचा अभ्यास करणारा पहिला टिरॉस उपग्रह सन १९६० मध्ये अवकाशात सोडण्यात आला.

* नोआ उपग्रहाची भ्रमणकक्षा १,४५० किमी अंतरावून उत्तर दक्षिण आहे, तो एकाच ठिकाणाहून दररोज दोन वेळा भ्रमण करीत असतो, त्यामुळे हवामानातील बदल त्वरित लक्षात येतात.

* नोवा मधील यंत्रणेकडून १०.५ ते १२.५ मायक्रॉन या वर्णपटलातील ढगातून उत्सर्जित होणारी उर्जा नोंदली जाते. त्यामुळे वातावरणातील तापमानात होणाऱ्या बदलांना अभ्यास करणे सहज शक्य होते.

* चक्रीवादळ पूर्वसूचना मिळू शकते उपग्रह यांच्या मदतीने छायाचित्रे घेऊन त्याद्वारे पृथ्वीवरील माहिती मिळते.

* उपग्रहातील रडारद्वारे समुद्राचा अभ्यास करणे सुलभ झालेले आहे. समुद्रातील वादळी वारे, वाऱ्याची दिशा व वेग अचूकपणे मोजता येतो.


कुत्रिम उपग्रहाचे प्रकार
* तरंगपरावर्तक उपग्रह - या प्रकारच्या उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील प्रक्षेपण केंद्राकडून पाठविलेले तरंग दुसऱ्या केंद्राकडे परावर्तीत केले जाते.

* दळणवळण उपग्रह - प्रकाश आणि ध्वनीचे आदान प्रदान करणारे हे उपग्रह तरंगवर्धक असतात. याद्वारे आंतरदेशीय दूरध्वनी आणि टेलिग्राफ सेवेसाठीच उपयोगात आणले जातात.

* मार्गदर्शक उपग्रह - आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या या प्रकारच्या उपग्रहाद्वारे जहाजांना किंवा विमानांना त्यांचे स्थान, त्यांची अक्षांश व रेखांश स्थिती कोणत्या दिशेने मार्गक्रमण सुरु आहे याचे मार्गक्रमण करीत असतात.

* हवामान निरीक्षक उपग्रह - हवामानाचे, परिस्थितीचे सतत निरीक्षण करून त्यातील बदलांची नोंद करून करून घेणे आणि ते बदल जमिनीवरील केंद्राकडे पाठविण्याचे कार्य हवामान निरीक्षक उपग्रह पूर्ण करीत आहेत.

* निरीक्षक उपग्रह - निरीक्षक उपग्रहाचे कार्य जमिनीवरील निरीक्षकाची नोंद घेऊन परत ती केंद्राकडे पाठविण्याचे असते.

* आंतरदेशीय उपग्रह - देशांतर्गत अंतर्गत भागात दूरध्वनी किंवा दूरदर्शनचे कार्य करण्याचे कार्य या उपग्रहाद्वारे केले जाते. देशातील विविध भागात संपर्क स्थापित करण्याच्या कार्यात हे उपग्रह उपयोगी आहे.

* भूगोलीय उपग्रह - देशा - देशांचा समूह किंवा शेजारचे देश एकत्र येवून दळणवळण यासाठी व आंतरविभागीय उपग्रहाचा उपयोग करतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.