बांडुंग परिषद


* दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शीतयुद्धचे वारे सर्वत्र पसरायला लागले. अनेक राष्ट्र्मध्ये शीतयुद्ध मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. एकमेकांचे राष्ट्र हे परस्परांचे वैरी होवू लागले.

* अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संबंधावर विचार विनिमय करण्यासाठी आशिया खंडातील जवळपास २३ आणि आफ्रिका खंडातील जवळपास ६ असे एकूण २९ राष्ट्रांनी इंडोनेशियातील बांडुंग येथून १८ एप्रिल १९५५ ला बांडुंग परिषद भरविण्यात आली.

* या बांडुंग परिषदेचे अध्यक्षस्थानी इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष डॉ सुकार्णो होते. यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या बांडुंग परिषदेमध्ये पंडित नेहरूंनी आपल्या पंचशील तत्व मांडून त्या तत्वांना मान्यता प्राप्त करून घेतली. सामन्यात या बांडुंग परिषदेची तत्वे पुढीलप्रमाणे होती.

बांडुंग परिषदेची तत्वे
* कोणत्याही राष्ट्रांनी परस्परांच्या देशावर आक्रमण करू नये.

* परस्परांच्या राष्ट्रातील वादग्रस्त प्रश्नाची सोडवणूक शांतता मार्गाने करावी.

* कोणत्याही राष्ट्रांनी परस्परांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करू नये.

* आंतरराष्ट्रीय न्यायाबद्दल किंवा परस्परांच्या राष्ट्रातील न्यायाबद्दल आदर बाळगावा.

* एकमेकांच्या प्रदेशातील एकता व अखंडता भंग होणार नाही. याची काळजी घेणे.

* परस्परांच्या हिताचे रक्षण करून समानतेचे तत्व स्वीकारणे.

* राष्ट्र संरक्षणासाठी एकट्याने संघर्ष न करता सामुहिक रीतींने ते प्रश्न सोडविणे.

* देशहितासाठी गुप्त करार करण्याची कराराला बळी पडणार नाही.

* आंतरराष्ट्रीय मुलभूत हक्काचा सर्व राष्ट्राकडून आदर केला जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.