पर्यावरण जागतिक संघटना

आंतरराष्ट्रीय जीवावरण कार्यक्रम [IBP]
* हा कार्यक्रम सन १९६४ मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेमार्फत घेण्यात आला. परंतु आता हि संघटना अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाबरोबर जैविक घटकांची क्षमता मानव कल्याण यासाठी कार्य करीत आहे.

* भूपृष्ठावरील प्रजातीय उत्पादन क्षमतेचा अभ्यास करणे, वनस्पतीच्या वाढीकरिता सौर उर्जेचा उपयोग करणे.

* नैसर्गिक मुलस्थानांचे जतन, सागरी जीव व त्याच्या वस्तीस्थानांचा अभ्यास करणे, पर्यावरण व मानवी जीवनाचा अभ्यास करने, जैविक घटकांचे संवर्धन करणे.


जागतिक पर्यावरण जनजागृती परिषद
* ५ जून १९७२ रोजी स्टोकहोम स्वीडन येथे हि जागतिक परिषद घेण्यात आली आहे. भारताचे प्रतिनिधी यात समाविष्ट होते.

* त्यात पर्यावरण प्रदूषण, आम्लवर्ष, ओझोन क्षय इत्यादी प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

* मानवी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे सर्वेक्षण  संशोधन करणे, हवामान बदलाकरिता खास यंत्रणा निर्माण करणे, पर्यावरणाची जनतेला जाणीव करून देणे.


वसुंधरा शिखर परिषद
* संपूर्ण जगातील १५६ राष्ट्रांनी ३ ते १४ जून १९९२ या कालावधीत ब्राझील देशातील रिओडी जानिरो शहरात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

* मानवाच्या विकासाकरिता पर्यावरणाचा शाश्वत विचार करणे, पृथ्वीवरील हवामानाच्या बदलांचा विचार करणे.

* नैसर्गिक संपत्तीचा साठा व उपयोग यांचा अभ्यास करणे, जैविक विविधतेचा अभ्यास व संवर्धन करणे.

* प्रदूषण नियंत्रणाचे मार्ग शोधणे. प्रगत व विकसित देशानी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी घेणे. विनाशकारी शस्त्रांचा वापरावर नियंत्रण करणे.


जी - ८ परिषद
* ७ जून २००७ रोजी जर्मनी येथील हायलिंगडम येथे जी ८ परिषद झाली. या गटातील अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी फ्रान्स, जपान, Canada, इटली या आठ देशांची परिषद घेण्यात आली.

* या परिषदेत ग्लोबल वार्मिंग सन २०५० पर्यंत रोखणार, जागतिक शांताता राखणे, रोजगार विकास करणे. गरीब देशातील दारिद्रय निर्मुलन करणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.