सायबर क्राईम आणि प्रतिबंध

सायबर क्राईम
* संगणकीय क्षेत्राच्या आधारे केले गेलेले अपराध किंवा गुन्ह्याचा समावेश सायबर क्राईम किंवा सायबर गुन्ह्यामध्ये होतो. असे गुन्हे घडवून आणणारे अपराधी सायबर गुन्हेगार असतात.

* संगणकीय जाळ्यांच्या आधारे महत्वाच्या गुप्त किंवा गोपनीय माहितीची सुद्धा चोरी केली जाते. अशा संगणक क्षेत्रातील गुन्हे सामान्य किंवा अन्य गुन्ह्यापेक्षा कायद्याने वेगळे नाहीत. सायबर क्राईम हा एक पारंपारिक गुन्ह्याचाच प्रकार आहे.

* संगणक हे एक टारगेट किंवा लक्ष मानून केलेली बेकायदेशीर कारवाई म्हणजे सायबर क्राईम होय.

* कमी जागेत अधिकाधिक डाटा, आकडेवारी, माहिती साठविण्याची जागा, म्हणजे संगणक होय. संगणकापर्यंत पोहोचविणे  यंत्र अवगत करणे सहजसुलभ शक्य आहे.

* संगणक कार्यालयातील दुर्लक्षितता, बेजबाबदारी, पुराव्याचा अभाव या परिस्थितीमुळे संगणकीय गुन्हे व चोरी सहज शक्य आहे.

संगणकीय गुन्हेगार
* बालवयातील गुन्हेगार, संघटीत हकर्स, व्यावसायिक हकर्स, संगणकीय क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश, सेवा वितरणामधील हल्लेखोरी, विषाणूचा मारा, इंटरनेट वेळेतील चोरी, फसवणूक व भ्रष्टाचार

* वरील सर्व गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी २७ मे २००० रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० समंत करण्यात आला.

रोबॉट
* एखाद्या कारखान्यामध्ये किंवा इतरत्र मानवाप्रमाणे कार्य करणारे यंत्र म्हणजे यंत्रमानव होय. यंत्रमानवाची रचना करणे, घडविणे व वापरणे यालाच रोबो असे म्हणतात.

* रोबॉट धोकादायक कामापासून मानवाची मुक्ती करतात.

* मानवाला घाणेरडी, कंटाळवाणी, किंवा कमीपणाची वाटणारी कामे रोबॉट बिनदिक्कतपणे करतात.

* कोणतेही कार्य रोबॉट सुसंगतपणे न थकता आणि बिनतक्रार करतात.

* रोबॉट अतिशय जड व अतिशय नाजूक भाग असलेली कामे बिनदिक्कतपणे करतात.

* रखवालदारी आग आणि घरफोडी धोकादायक सूचना परिरक्षक आणि सनियंत्रक म्हणून कठोरपणे विश्वसुपणे, आणि अविश्रांतीपणे देत असतात.

* माणसापेक्षा रोबॉट कामासाठी कमी खर्चिक असते. रोबॉट माणसापेक्षा कामासाठी कमी खर्चिक ठरतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.