भारतातील व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणव्यवस्था

अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ [ AICTE ]
* १९४५ साली अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले. 

* ही अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था केंद्रशासन व राज्यशासन यांना तांत्रिक शिक्षणसंस्था स्थापन करणे व त्यांचा विकास करणे इत्यादीसाठी मार्गदर्शन करते.

* सध्या तांत्रिक शिक्षण मान्यता व नियंत्रणाचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते.


राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षणवरील मंडळ [ NCTVT ]
* कामगारांना व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे [ ITI ] नियमन राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेमार्फत केले जाते.

* पॉलीटेकनिक नियंत्रण याच संस्थेमार्फत केले जाते. प्रत्येक राज्यात तंत्रशिक्षण मांडळ [ Board of Technical Education ] कार्य करते.

* हे मंडळ आपल्या राज्यात तंत्रशिक्षण संस्थांचे नियमन करते व राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते.


भारतीय तंत्रसंस्था [आय आय टी]
* औद्योगिक तंत्र व अभियांत्रिकी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख संस्था म्हणजे भारतीय आय आय टी होय.

* राज्यशासन व केंद्रशासन यांच्या संयुक्त पुढाकाराने या संस्थांची स्थापना केली आहे.
भारतीय व्यस्थापन संस्था

* उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय व्यस्थापन संस्था स्थापन केली आहे.

* उद्योगातील व्यवस्थापन क्षेत्रातील अतिप्रगत प्रशिक्षण देण्याचे कार्य आयआयएम या संस्थेमार्फत केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.